काँग्रेसची उमेदवारी घेतली आता तर भाजपच्या काहीआमदारांनी मला वोट दिले असते ; एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

मुंबई - विधानपरिषद निवडणुकीतील सर्व उमेदवारांची घोषणा होऊन ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. मात्र भाजपकडून डावलले गेलेल्या एकनाथ खडसे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. 'विधानपरिषदेच्या सहाव्या जागेसाठी मला काँग्रेसकडून ऑफर होती. मी काँग्रेसची उमेदवारी घेतली असती तर भाजपच्या ६ ते ७ आमदारांनी मला क्रॉस वोट केले असते. या आमदारांनी तसे माझ्याकडे मान्यही केले होते,' असा खळबळजनक गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केला आहे.
भाजपने विधानपरिषद निवडणुकीत एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना डावलत नवीन उमेदवारांना संधी दिली. त्यामुळे ज्या ज्येष्ठ नेत्यांना बाजूला करण्यात आले त्यांच्यामध्ये नाराजी असल्याचे पाहायला मिळत आहे. एकनाथ खडसे यांनी ही नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी आश्वासन देऊनही दगाफटका झाला, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे. 
विधानपरिषद उमेदवारीसाठी भाजपने डॉक्टर अजित गोपचडे, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांचे तिकीट कापत भाजपने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. भाजपने ही निवडणूक देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये लढली होती.दिग्गज नेत्यांना डावलण्यात आल्याने देवेंद्र फडणवीस यांनीच आपल्या पक्षांतर्गत विरोधकांचा पत्ता कट केल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर आता पुन्हा खडसे, तावडे, मुंडे आणि बावनकुळे यांना विधानपरिषद उमेदवारीपासूनही दूर ठेवल्याने पक्षात अजूनही फडणवीसांचे वर्चस्व असल्याचे बोलले जात आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget