निर्मला सीतारमन यांची मोठी घोषणा ; मजुरांना २ महिने मोफत धान्य, फेरीवाल्यांसाठी ५ हजार कोटी

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटी रुपयाचे स्वावलंबी भारत अभियान’ पॅकेज जाहीर केले. त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज दुसरी पत्रकार परिषद घेत या पॅकेजची सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी गरीब, शेतकरी, मजुरांसाठी ९ मोठ्या घोषणा केल्या, यामध्ये फेरीवाल्यांसाठी ५ हजार कोटी, प्रवासी मजुरांना कमी किमतीत राहण्याची व्यवस्था, मजुरांना आणखी २ महिने मोफत धान्यअशा महत्त्वाच्या घोषणा केल्या.अर्थमंत्र्यांनी ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ची घोषणा केली. “रेशन कार्डाची पोर्टेबिलीटी करणार, या माध्यमातून गोरगरीब जनता देशातील कोणत्याही कानाकोपऱ्यात आपल्या वाट्याचे धान्य घेऊ शकतील”, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले. तसेच, “फेरीवाल्यांसाठी केंद्र सरकार ५ हजार कोटींची मदत करणार आहे. महिन्याभरात फेरीवाल्यांसाठी खास योजना अंमलात आणली जाईल”, असेही अर्थमंत्र्यांनी सांगितले.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget