माओवाद्यांना आर्थिक मदत करणाऱ्या आरोपीला अटक

मुंबई - नेपाळमधील माओवाद्यांच्या संपर्कात असलेल्या असलेल्या अट्टल दरोडेखोर दलवीरसिंग बलवंतसिंग रावत उर्फ पप्पू नेपाळी याला महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाच्या जुहू युनीटने अटक केली आहे. राज्यातील मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात ३० हून अधिक जबरी चोरी व दरोड्याचे गुन्हे आरोपीवर दाखल आहेत.
एन्काऊंटर फेम व एटीएस पथकाचे पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या पथकाने अंधेरी पश्चिम येथे एका पेट्रोल पंपाजवळ लूटमार करण्यासाठी आलेल्या या आरोपीला हत्यारांसह अटक केली आहे. सदर अटक आरोपीने त्याच्या टोळीसह मिळून २०१७ साली आंध्रप्रदेश मधील विजयवाडा येथील एका सोन्याचे दागिने बनविणाऱ्या कारखान्यावर दरोडा टाकून तब्बल, १६ किलो सोन्याची लूट केली होती. मात्र, या गुन्ह्यात तो आजपर्यंत फरार होता.दरोडा टाकल्यानंतर लुटलेल्या मुद्देमालातील बराचसा पैसा हा आरोपी नेपाळमधील माओवाद्यांना पुरवित असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. मुंबई ठाणे व नवी मुंबई परिसरात आतापर्यंत त्याने ३० हून अधिक दरोडे टाकले असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. अटक आरोपीकडून १ देशी बनावटीचे पिस्तूल व ३ जिवंत काडतुसे पोलिसांनी हस्तगत केली आहेत.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget