सलमान खान लवकरच अडकणार लग्नबंधनात ? गर्लफ्रेंड युलिया वंतूर म्हणाली....

मुंबई - सलमान खानच्या लग्नाची चर्चा तर बॉलिवूडमध्ये नेहमीच होताना दिसते. पण जेव्हाही सलमानला त्याच्या लग्नाबाबत कोणताही प्रश्न विचारला जातो त्यावेळी तो हा प्रश्न टाळताना दिसून येतो. सलमान खान मागच्या काही काळापासून मॉडेल आणि अभिनेत्री युलिया वंतुरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. दरम्यान एका मुलाखतीत युलियाला सलमान खानशी लग्नाबाबत काय प्लान आहे असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर नेहमी मौन बाळगणाऱ्या युलियाने यावर अखेर उत्तर दिले आहे.युलियाने नुकतीच एका वेबसाइटला मुलाखत दिली. ज्यात तिला सलमानसोबत लग्नाबाबत प्रश्न विचारण्यात आले. यावर युलिया म्हणाली, जीवनात आनंदी राहणे महत्त्वाचे आहे. लग्न झाले आहे किंवा नाही याने मला काही फरक पडत नाही. हा प्रश्न मला लगातार विचारला जात आहे. पण जर दोन व्यक्ती एकमेकांसोबत वेळ घालवून जर आनंदी असतील तर त्यांना आनंदी राहण्याचा पूर्ण हक्क आहे. एक वेळ अशी होती की, माझ्या आई-वडीलांनी सुद्धा हा प्रश्न मला बऱ्याच वेळा विचारला होता. शेवटी कंटाळून मी त्यांना विचारले तुमच्यासाठी काय महत्त्वाचे आहे मी आनंदी आहे हे की मी लग्न करणे.
युलियाच्या बोलण्यातून ही गोष्ट तर स्पष्ट आहे की, सध्या तरी सलमान आणि तिचा लग्नाचा कोणताही प्लान नाही. सध्या युलिया सलमानच्या पनवेल फार्म हाऊसवर अडकलेली आहे. लॉकडाऊनमुळे तिला मुंबईला परतणे शक्य नाही. काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात ती घोडस्वारी करताना दिसली होती.सलमानच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचे तर त्याचा राधे हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या लॉकडाऊनमुळे बॉलिवूडच्या अनेक सिनेमांचे शूटिंग थांबले आहे. या सिनेमात त्यांच्यासोबत दिशा पाटनी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget