जोधपूर स्थानकात उभ्या असलेल्या पॅसेंजरला लागली आग

जोधपूर - राजस्थानमधील जोधपूर रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या पॅसेंजर गाडीच्या एका बोगीने रात्री अचानक पेट घेतला. बघता बघता आगीने रौद्र रुप धारण केले आणि आग बोगीभर पसरली. या आगीमध्ये पॅसेंजर ट्रेनचे दोन डबे जळून खाक झाले आहेत. अचानक लागलेल्या आगीमुळे रेल्वे स्थानकात मोठा गोंधळ उडाला होता.
मुख्य स्थानकामागच्या वेसिंग लाईनमध्ये उभ्या असलेल्या ट्रेनच्या बोगीला ही आग लागली आणि साधारण ३० मिनिटे ही आग धुमसत होती. रेल्वेच्या दोन्ही डब्यातून जळालेल्या ज्वाळांना पाहून जीआरपी आणि पोलिसांसह अग्निशमन दलाच्या घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाने या आगीवर नियंत्रण मिळवले असून,या दुर्घटनेत कोणतीही मानवी जीवितहानी झालेली नाही अशी माहिती समोर आली आहे.
जोधपूरहून बीकानेरला जाण्यासाठी पॅसेंजर ट्रेन उभी होती. या रेल्वे गाडीच्या बोगीने अचानक पेट घेतला. अग्निशमन दलाचे सीएफओ संजय शर्मा यांनी सांगितले की कंट्रोल रूमच्या माहितीनुसार नागौरी गेट व शास्त्री नगर येथून अग्निशमन दलाच्या ४ गाड्यांनी मिळून या आगीवर नियंत्रण मिळवले. ट्रेनच्या बॅटरीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागल्याचे सांगितले जात आहे. मात्र रेल्वेच्या डब्यात आग लागल्याची घटना घडल्यानंतर रेल्वेनेही आगीचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. निर्जन ठिकाणी पार्क केलेल्या ट्रेनला कशी आग लागली याचा शोध घेतला जात आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget