कर्नाटकात फक्त रविवारीच राज्यव्यापी लॉकडाऊन - येडियुराप्पा

बंगळुरु - कर्नाटकमध्ये फक्त रविवारी राज्यव्यापी लॉकडाऊन लागू राहील. इतर दिवशी फक्त ‘कन्टेन्मेंट झोन’मध्ये लॉकडाऊन असेल, असे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी जाहीर केले. कन्टेन्मेंट झोन वगळून उर्वरित राज्यातील सर्व व्यवहार पूर्ववत सुरू होतील. मात्र महाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू व केरळ या चार राज्यांमधील लोकांना कर्नाटकमध्ये प्रवेश दिला जाणार नाही, असेही येडियुराप्पा म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी असेही सांगितले, की कर्नाटकच्या सीमांच्या आत रेल्वेगाड्या सुरू होतील. तसेच रेड व कन्टेन्मेंट झोन वगळून राज्यात इतर सर्व ठिकाणी राज्याच्या एसटी बस धावू लागतील. तसेच प्रतिबंधित क्षेत्रात अत्यावश्यक सेवा पुरवणारी दुकाने सुरू असतील, असे त्यांनी सांगितले.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget