युएईतील भारतीय नागरिकांना घेऊन एअर इंडियाची विमाने केरळात दाखल

तिरुवअनंतपूरम - विदेशात अडकलेल्या नागरिकांना मायदेशात आणण्यासाठी केंद्र सरकारने 'वंदे भारत मिशन' सुरू केले आहे. त्याअंतर्गत एअर इंडियाचे पहिले विमान १७७ प्रवाशांना अबुधाबीतून घेऊन आले आहे. काल (गुरुवार) रात्री १०.०९ मिनिटांनी विमान कोची आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले.
एअर इंडिया एक्सप्रेस IX ४५२ फ्लाईट १७७ प्रवासी आणि चार लहान मुलांना घेऊन भारतात आली. एअर इंडियाच्या प्रवक्त्याने याबाबत माहीती दिली. तर एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाईट IX ३४४ त्यानंतर काही वेळातच कोझीकोड आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरली. हे विमान दुबईवरून १७७ प्रवासी आणि ५ लहान मुलांना घेऊन भारतात आले.सर्वांना विलगिकरण कक्षात ठेवण्यात येणारभारतात आणलेल्या नागरिकांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. ज्या जिल्ह्यातील नागरिक असतील तेथे त्यांची क्वारंटाईनची व्यवस्था जिल्हा प्रशासनाने केली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget