गुजरातमधील मुख्यालय मुंबईत हलवणार आयसीआयसीआय बँकेचा निर्णय

मुंबई - शनिवारी आयसीआयसीआय बँकेच्या संचालक बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आला. बँकेचे मुख्यालय गुजरातमधून महाराष्ट्रात हलवण्यात येणार आहे. आयसीआयसीआय बँकेचे भागधारक मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. आयसीआयसीआयने त्या प्रमाणे मुंबई शेअर बाजाराला आणि राष्ट्रीय शेअर बाजाराला याबाबतची माहिती दिली आहे. बँकेने वडोदरातील मुख्यालय मुंबईत हलवण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेचे कोणतेही कर्मचारी किंवा वडोदऱ्यातील कोणत्याच व्यवसायात बदल केलेला नाही. हा बदल फक्त पेपरवरती करण्यात आल्याचे बँकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. 
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमधील मुख्यालय मुंबईत हलवल्यामुळे आयसीआयसीआय बँक कार्पोरेट इनकम टॅक्स मुंबईला देणार आहे. केंद्रीय करात वाढ होणार असून तो महाराष्ट्रात येणार आहे. तसेच मोठ्य कार्पोरेट कर्जावर स्टॅम्प ड्युटी देखील महाराष्ट्रात भरली जाणार आहे. आयसीआयसीआय बँकेच्या संचालकांची शनिवार बैठक झाली. त्यात सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान या निर्णयाला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ना हरकत प्रमाणपत्र अर्थात दिले आहे.तसेच बँकेचं मुख्यालय एका राज्यातून दुसऱ्या राज्यात नेण्यासाठी काही नियमांचे पालन करावे लागते तसेच काही औपचारिकता पण पूर्ण कराव्या लागतात. त्या पूर्ण केल्या जाव्यात असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्पष्ट केले आहे.

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget