जम्मू-काश्मीरमध्ये एक दहशतवादी ठार

श्रीनगर - जम्मू-काश्मीर येथे पुलवामा जिल्ह्यातील दक्षिणेकडील अवंतीपोरा भागात सुरक्षा दलाचे जवान आणि अतिरेक्यांच्या दरम्यान सुरु असलेल्या चकमकीत एक दहशदवादी ठार झाल्याची माहिती आहे. सुरक्षा दलाने अवंतीपोरा येथे पामपोरला वेढले होते, जेथे २-३ अतिरेकी लपल्याचा संशय आहे. सूत्रांच्या माहितीनुसार दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर रियाज नायकू येथे लपला असावा, अशी शक्यता आहे.
लष्कराची  50RR, CRPF की 185BN आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने ख्रू पानपोरच्या शहरी परिसराला घेरले आणि शोध मोहीम सुरू केली. या शोध मोहिमेदरम्यान सुरक्षा कर्मचारी आणि दहशतवादी यांच्यात चकमकीला सुरुवात झाली. सुरक्षा दलाने संशयास्पद जागेला घेराव घातला असून या भागात शोध मोहीम सुरु केली आहे.त्याचबरोबर अवंतीपोरा येथील बेगपोरा भागात शोध मोहीम सुरु आहे. जिथे हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर रियाज नायकू लपल्याची भीती व्यक्त केली जात आहे. हे रियाज नायकूचे वडिलोपार्जित गाव आहे. माहिती मिळाल्यानंतरच शोध मोहीम सुरु करण्यात आली. चार दिवसांत बेगपोरा येथे ही पाचवी चकमक आहे.  
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget