३ मे नंतर ऑरेंज,ग्रीन झोनमधील निर्बंध शिथील करण्यात येतील - उद्धव ठाकरे

मुंबई - देशात ३ मी पर्यंत लॉकडाऊन आहे.लॉकडाऊन नंतर मुंबई आणि पुण्यासह राज्यातील रेड झोन असलेल्या परिसरांमधील लॉकडाऊन तात्काळ उठवणार नसल्याचे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. त्यामुळे ३ मे नंतरही राज्यातील रेड झोन भागांमध्ये लॉकडाऊन सुरुच राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. उद्धव ठाकरे यांनी आज फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ३ मे नंतर महाराष्ट्रातील ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील निर्बंध शिथील करण्यात येतील, असे सांगितले. मात्र, याठिकाणी पुन्हा गर्दी होत असेल तर लॉकडाऊनचे निर्बंध पुन्हा लादण्यात येतील, असेही त्यांनी बजावले आहे. 
मुंबई, कल्याण-डोंबिवली, पुणे, नागपूर आणि औरंगाबदचा परिसर हा रेड झोनमध्ये आहे. त्यामुळे याठिकाणी दैनंदिन व्यवहार सुरु झाले आणि कोरोनाचा विस्फोट झाला तर आतापर्यंत केलेली तपश्चर्या फुकट जाईल. लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या आणि व्यवसाय ठप्प झाले आहेत. मात्र, जनता हीच खरी देशाची संपत्ती असते. त्यामुळे कोरोनाचा प्रभाव संपल्यानंतर आपण राज्याचा गाडा या चिखलातून बाहेर काढू, असा विश्वास देखील उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
राज्यातील आरोग्य यंत्रणा उत्तमप्रकारे कोरोनाचा सामना करत असल्याचे त्यांनी सांगितले. सुदैवाने राज्यात आतापर्यंत आढळून आलेल्या रुग्णांपैकी ७५ ते ८० टक्के लोकांमध्ये कोरोनाची अतिसौम्य किंवा काही जणांमध्ये लक्षणेही नाहीत. केवळ त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच राज्य सरकार कोरोनावर जगभरात सुरु असलेल्या संशोधनावर लक्ष ठेवून आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget