केरळातील १० जिल्हे ऑरेंज झोनमध्ये तर २ रेड झोनमध्ये

तिरुवअनंतपूरम - केंद्र सरकारने कोरोना संसर्गाच्या प्रभावानुसार जिल्ह्यांचे नव्याने वर्गीकरण केले आहे. त्यानुसार राज्यातील १० जिल्हे ऑरेंज झोनमध्ये असून प्रत्येकी दोन जिल्हे रेड आणि ग्रीन झोनमध्ये आहेत. एर्नाकूलम आणि वायनाड जिल्हे ग्रीन झोनमध्ये असून कन्नूर आणि कोट्टायम रेड झोनमध्ये आहेत.३ मे ला देशभरातील लॉकडाऊन संपत आहे. त्यानंतर राज्य सरकारांनी कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी कसे व्यवस्थापन करावे, याचा आढावा गृहमंत्रालयाने घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्याचे वर्गीकरण नव्याने करण्यात आले आहे. रेड आणि ऑरेंज झोन असलेल्या भागांमध्ये निर्बंध लागूच राहणार असून ग्रीन झोनमध्ये शिथील होण्याची शक्यता आहे.केरळ राज्यामध्ये आत्तापर्यंत ४९७ कोरोनाग्रस्त आढळून आले असून ३८३ जण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर ४ जणांचा मृत्यू झाला आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget