मोदी सरकावर शिवसेनेचा सामनातून हल्लाबोल

मुंबई - कोरोनामुळे अडचणीत आलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी केंद्र सरकारनं २० लाख कोटींचं पॅकेज जाहीर केले. त्यास आत्मनिर्भर भारत असे नाव दिले आहे. त्यामुळे आधीच्या सर्व संकल्पना आणि योजना मागे पडल्या. मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडियाच्या नुसत्या जाहिरातबाजीवर आतापर्यंत कोट्यवधी खर्च केले गेले. तसे आत्मनिर्भरतेच्या बाबतीत घडू नये, असा टोला सामनाच्या संपादकीतून लगावला आहे. केंद्र सरकारने पॅकेज जाहीर केले. मात्र, उत्साह दिसून आला नाही. अर्थसहाय्याने आधी शेअर बाजार कोसळला आणि मग त्याने हळूच पापण्या उघडल्या. बाजारातील हा उल्हास सदैवे असाच राहू दे, अशी टीका शिवसेनेने केली आहे.
पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केलेल्या २० लाख कोटींचे वाटप अर्थमंत्र्यांनी असे 'पटापट' केले की, पट्टीचा अर्थतज्ज्ञही चाट पडावा. असे असले तरी पंतप्रधानांनी निर्मला सीतारामण यांचे तोंडभरुन कौतुक केल्याचे प्रसिद्ध झाले आहे. पंतप्रधानांच्या मते २० लाख कोटींत देश पुन्हा उभा राहिल. मुख्य म्हणजे आत्मनिर्भर होईल, ही आत्मनिर्भरता सर्वच क्षेत्रांत यायला हवी. चिनी मालाची आवक थांबलली नाही. ती थांबवल्याची घोषणा केल्याशिवाय मेणबत्त्यांपासून काडीपेटीपर्य़ंत आपल्या लघू,सूक्ष्म उद्योगांना उठाव मिळणार नाही, असे शिवसेनेने म्हटले आहे.
२० लाख कोटी ही साधी रक्कम नाही. मात्र, असे असताना शेअर बाजार का पडला. आर्थिक पॅकेज जाहीर झाल्यानंतर शेअर बाजारात घसरण का यावी, हा मोठा प्रश्न आहे. याबाबत कॉर्पोरेट जगतात शंका आहे. कोरोनाच्या निमित्ताने मोदी यांनी आत्मनिर्भर भारताचा विडा उचलला आहे. त्यानुसार उद्योग क्षेत्रात स्वावलंबी करण्याचे ठरवले आहे. सरकारी खरेदी प्रक्रियेत २०० कोटींपेक्षा कमी किमतीच्या निविदांमध्ये मध्यम उद्योगांना प्राधान्य मिळेल. त्यातून देशी उद्योगांना चालना मिळेल. म्हणजे मोदी पुन्हा महात्मा गांधी यांच्या स्वदेशी चळवळीच्या दिशेने देशाला नेत आहेत. मुंबईतील बांधकाम व्यवसाय बंद पडला आहे. त्याला उभारी कधी मिळणार, लघू उद्योगांना प्राधान्य देताना या क्षेत्रातील कामगारांना तीन महिने पगार मिळालेला नाही. ११ कोटी लोकांना कोणता लाभ होणार आहे, असा सवालही उपस्थित करण्यात आला.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget