व्हॉट्सअप स्टेटसवरुन तरुणाचा खून ; पाच तासात मारेकऱ्यांना अटक

पुणे - व्हॉट्सअप स्टेटसवरुन झालेल्या वादातून धारदार शस्त्राने तरुणाचा खून केल्याने खळबळ उडाली. ही घटना मावळ परिसरातील टाकावे गावात घडली. यश रोहिदास असवले असे खून करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तर मुख्य सूत्रधार ऋतिक असवलेसह अजय जाधव, अतिश लंके, विकास रिठे, ऋतिक चव्हाण, अश्विन चोरगे, निखिल काजळे अशी बेड्या ठोकण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. वडगाव पोलिसांनी अवघ्या पाच तासात मारेकऱ्यांना जेरबंद केले आहे.
खून झालेला यश आणि आरोपी ऋतिक यांच्यात काही महिन्यापूर्वी व्हाट्सअप स्टेट्स ठेवण्यावरुन वाद झाला होता. हे प्रकरण पोलिसात गेले. मात्र, त्यानंतर हा प्रकार निवळला होता. परंतु, पुन्हा त्यांच्यात व्हाट्सअप स्टेट्स ठेवण्यावरून वाद झाला. यश हा त्याच्या दोन मित्रांसह टाकावे गावाच्या बाहेर पायी जात असताना तीन दुचाकीवरुन आलेल्या सात जणांनी दोन मित्रांना पकडून ठेवत यशवर धारदार शस्त्रांनी सपासप वार केले.
धारदार शस्त्राने वार झाल्यामुळे रक्ताच्या थारोळ्यात यश बेशुद्ध पडला. घटनास्थळावरून आरोपींनी पोबारा केला. दरम्यान, जखमी यशला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी घटनास्थळला भेट देऊन घटनेचा तपास सुरू केला. तेव्हा, मृत झालेल्या यश आणि आरोपी ऋतिक याचे भांडण झाल्याचे समोर आले. त्यानुसार त्याचा शोध घेऊन त्याच्यासह सात जणांना अटक करण्यात आले.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget