देशांतर्गत विमान प्रवासासाठी बुकिंग सुरू ; मात्र सामान्य प्रवाशांसाठी ही सुविधा नाही

नवी दिल्ली - देशांतर्गत विमान सेवा १८ मे पासून सुरू होत आहे. मात्र, सामान्य प्रवाशांसाठी ही सुविधा नसेल. यासंदर्भात एअर इंडियाने एक निवेदनही जारी केले आहे. यात स्पष्ट करण्यात आले आहे, की परदेशात अडकलेले जे लोक देशात परत येत आहेत. केवळ त्यांच्यासाठीच देशांतर्गत विमानसेवा चालवली जाईल. ही उड्डाणे सामान्य प्रवाशांसाठी नसतील.
परदेशात अडकलेले भारतीय नागरिक देशात आल्यानंतर, त्यांच्या समोर घरी जाण्याचा प्रश्न उभा राहत आहे. यामुळे. त्यांच्यासाठी देशांतर्गत विमान सेवा सुरू करण्यात आली आहे. वंदे भारत मिशनच्या दुसऱ्या टप्प्यात ३१ देशांतून ३० हजार भारतीय स्वदेशात परततील. यासाठी १६ मे ते २२ मे दरम्यान १४९ विमान उड्डाणे होतील. वंदे भारत मिशनच्या पहिल्या टप्प्यात एयर इंडिया आणि सहकारी एअर इंडिया एक्सप्रेसने ७ मे पासून १४ मे पर्यंत ६४ उड्डाणे केली आहेत. यात १२ देशांमधून १४,८०० भारतीयांना देशात आणण्यात आले. यासाठी त्यांना प्रवासाचे शुल्कही आकारले गेले.
एअर इंडियाने भारतातून अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, फ्रँकफर्ट, पॅरिस आणि सिंगापूरसाठी काही मोजक्या उड्डाणांसाठी गुरुवारी सायंकाळपासून बुकिंग सुरू केले आहे. या विमानातून केवळ वरील देशांच्या नागरिकांनाच प्रवास करता येईल. मात्र, काही उड्डाणांत त्या देशांत काही वेळासाठी वैध व्हिसा असणाऱ्यांनाही प्रवासाची परवानगी असेल. एअर इंडियाने यासंदर्भात एक ट्विट करत माहिती दिली आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget