खासगी डॉक्टरांना सरकारची नोटीस

मुंबई - कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यामुळे आरोग्य विभागावर आलेला एकंदर ताण पाहता आता सरकारने मुंबईतील खासगी डॉक्टरांनाही एक नोटीस बजावली आहे. कोरोनाशी लढा देण्यासाठी खासगी तत्त्वांवरव सेवा देणाऱ्या डॉक्टरांनी सेवाभावाने पुढे येत आपले योगदान द्यावे असे ही नोटीसमध्ये नमूद केले आहे.मुख्य म्हणजे सदर डॉक्टरांनी सेवा देण्यास नकार दिल्यास त्यांनी कडक कारवाईला सामोरं जावे लागणार आहे. ज्याअंतर्गत त्यांच्यावर परवाना रद्द करण्याचीही धडक कारवाई केली जाऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे. 
मुंबईत जवळपास २५ हजारहून अधिक खासगी डॉक्टर आहेत. त्यामुळे कोरोनाशी सुरु असणाऱ्या लढ्यामध्ये त्यांचं योगदान हे महत्त्वाचे ठरणार आहे. कोरोनावरील उपायांमध्ये योगदान देण्यास पुढे येणाऱ्या या डॉक्टरांनी ज्या रुग्णालयात ते तैनात असतील तेथे १५ दिवस व्यतीत करत सेवा द्यावी. मुख्य म्हणजे नियुक्त केलेले डॉक्टर ठराविक रुग्णालयाच्या सेवेत रुजू झाले नाहीत तर त्यांच्यावर परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल असे सरकारने जारी केलेल्या नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून काही डॉक्टरांनी दवाखाने बंद केले होतं. शिवाय संशयितांना तपासण्यास काही डॉक्टरांनी नकार दिल्याच्या घटनाही समोर आल्या. पण, आता मात्र या सर्वच डॉक्टरांना सरकारच्या या आदेशाचे पालन करावे लागणार आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget