ठाण्यात रेपिड एक्शन फोर्स दाखल ; नागरिकांना बाहेर न पडण्याचे आवाहन

ठाणे - शहरासह जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा संख्या वाढत आहे. मात्र, नागरिक प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे काणाडोळा करत असून सरकारी आदेश धुडकावत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे पोलिसांच्या मदतीसाठी अखेर रॅपिड अ‌ॅक्शन फोर्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले. 
नागरिकांना शिस्त लावण्याचे प्रयत्नठाणे जिल्ह्यात ४५७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच महापालिका हद्दीमध्ये २ हजार ७३९ जणांना कोरोनाची लागण झाली असून ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांना खबरदारी बाळगण्याच्या सूचना वारंवार दिल्या जात आहेत. मात्र, विनाकारण गाड्या घेऊन बाहेर फिरणे, गर्दी करणे, असे प्रकार घडत आहेत. बंदोबस्तासाठी पोलीस रात्रंदिवस काम करत आहेत. मात्र, आता पोलीस यंत्रणा देखील कोरोनाच्या विळख्यात सापडली आहे. राज्यात आतापर्यंत जवळपास १८ पोलीस कर्मचारी कोरोनाचे बळी ठरले आहेत. त्यामुळे अखेर रॅपिड अ‌ॅक्शन फोर्स सोमवारी शहरात दाखल झाली. या तुकड्यांनी ठाण्यातील वागळे इस्टेट, रामचंद्रनगर आदी भागात संचालन करत नागरिकांना बाहेर न पडण्याचे आवाहन केले.

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget