आणखी काही दिवस महाराष्ट्रातील जिल्ह्याच्या सीमा बंद राहणार ; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई - राज्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. तसेच, रेड झोन आणि कंटेनमेंट झोनमधील कोरोनाबाधितांची संख्या कमी करण्यावर सरकारचा भर आहे. त्यामुळे जिल्ह्याबाहेरील प्रवासावर अजूनही निर्बंध आहेत, जिल्ह्यांच्या सीमा अजून काही काळ बंदच राहतील, असे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे.कंटेनमेंट झोन वगळता इतर ठिकाणी एकल दुकाने सुरु करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली असली तरी साथरोग नियंत्रण कायद्यानुसार दिलेल्या अधिकारानुसार स्थानिक परिस्थिती पाहून जिल्हाधिकारी अथवा महानगरपालिका आयुक्त दिलेल्या सवलतीबाबत वेगळा निर्णय घेऊ शकतात. तसे करताना ते अधिकची सवलत देऊ शकत नाहीत, पण राज्य शासनाने दिलेली सवलत सकारण नाकारु शकतात, असेही सरकारने स्पष्ट केले.
कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १७ मे रोजीपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आले आहे. त्यासंदर्भात राज्य शासनाने सुधारित परिपत्रक काढले आहे. त्यामध्ये जीवनावश्यक नसलेल्या वस्तुंची दुकाने सुरु करण्यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. मात्र, यासंदर्भात दुकानदार आणि नागरिकांमध्ये संभ्रम राहू नये, यासाठी राज्य शासनाच्या वतीने शासनाचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांनी पत्रकारांच्या शंकांचे निरासन केले.राज्य शासनाच्या आदेशानुसार, शहरी भागात महानगरपालिका आणि नगरपरिषद हद्दीमधील मॉल्स, बाजार संकुल आणि बाजारातील जीवनावश्यक वस्तू विक्री करणाऱ्या दुकानांव्यतिरिक्त इतर दुकाने बंद राहतील. त्याचप्रमाणे कंटेनमेंट झोन वगळून शहरी भागात सर्व प्रकारची स्वतंत्र एकल दुकाने, कॉलनी दुकाने आणि निवासी संकुलातील दुकाने सुरु करता येतील.
क्षेत्रातील स्वतंत्र दुकाने, कॉलनी दुकाने आणि निवासी संकुलातील दुकाने असे दुकान स्थित असलेल्या गल्ली/रस्त्यावर अत्यावश्यक वस्तू विक्री दुकानांव्यतिरिक्त व्यवहार सुरु असलेल्या इतर दुकानांमध्ये जास्तीतजास्त ५ दुकाने चालु करण्यास अनुमती दिली आहे. मात्र, एका लेनमधील कुठली पाच दुकाने सुरु करावीत, यासंदर्भात त्या भागातील दुकानदारांनी आपआपसात ठरविल्यास चांगले होईल. मात्र, तसे न करता आल्यास यासंदर्भात जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका आयुक्त हे निर्णय घेतील, असे गगराणी यांनी सांगितले.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget