नक्षलवाद्यांकडून गडचिरोली बंद

गडचिरोली - नक्षलवादी व पोलीस यांच्यात नुकत्याच झालेल्या चकमकीत जहाल नक्सली नेता सृजनाक्का ठार झाली. या हत्येच्या निषेधार्थ नक्षलवाद्यांनी आज २० मे रोजी गडचिरोली जिल्हा बंदची घोषणा केली आहे.करोनाच्या टाळेबंदीत एक आठड्यापूर्वी नक्सलीनी अतिदुर्गम भागात पत्रके टाकून ही बंदची घोषणा केली होती. या बंदच्या पार्श्वभूमीवर आज बुधवारी पहाटेच्या सुमारास सावरगाव पोलीस मदत केंद्राअंतर्गत राष्ट्रीय महामार्गावर छत्तीसगढमधून रेती वाहतूक करणाऱ्या तीन ट्रकला आग लावून पेटवून दिले असल्याची माहिती समोर येत आहे. तीनही वाहने गडचिरोली येथील एका रेती कंत्राटदाराचे असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
पोलीसांनी अद्याप या वृत्ताला दुजोरा दिला नाही. मात्र, दोन दिवसापूर्वी झालेल्या चकमकीत दोन पोलीस शहीद झाले होते. त्यापूर्वी नक्सलींनी रस्त्याच्या कामाच्या वाहनांची जाळपोळ केली होती. त्यामुळे आजच्या बंद दरम्यान नक्सलवादी हिंसाचार घडवून आणतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, १७ मे रोजी गडचिरोलीतील भामरागड तालुक्यातील अलदंडी-गुंडूरवाहीच्या जंगलात सकाळी सहा वाजेच्या सुमारास नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भुसुरुंग स्फोटात पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमने (३०) व सी ६० पथकाचे शिपाई किशोर आत्राम हे शहीद झाले होते. या चकमकीत चार ते पाच नक्षलवादी ठार झाले असावेत अशी शक्यता गडचिरोली पोलीस दलाने व्यक्त केली होती.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget