शिधापत्रिकाधारकांची फसवणूक ;शिधावाटप दुकानाचा परवाना रद्द

नवी मुंबई - करोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून गोरगरिबांना मोफत अन्नधान्यांचे वाटप केले जात आहे. मात्र काही दुकानदार या गोरगरिबांना फसविण्याचा प्रयत्न करत आहेत. अशाच एका शिधावाटप दुकानदाराला अधिकाऱ्यांनी पकडून त्याचा परवाना रद्द केला आहे. 
घणसोलीमधील शिधावाटप दुकान क्रमांक ११४ बाबत शिधावाटप अधिकाऱ्यांकडे तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार शिधावाटप अधिकाऱ्यांच्या पथकाने येथे पाहणी केली असता शिधापत्रिकाधारकांना कमी अन्नधान्य वाटप केले असल्याचे समोर आले. तसेच, काही शिधापत्रिकाधारकांच्या घरी जाऊन पाहणी केली असता अनेकांना एक किलो धान्य कमी दिल्याचे समोर आले. या सर्वांची शहानिशा करून शिधावाटप दुकानाची पाहणी केली असता दुकानात आवश्यक तरतुदींची पूर्तता केलेली नव्हती. ज्यांच्या नावाने दुकानाचा परवाना आहे, ते सुरेश शिंदे उपस्थित नव्हते आणि फलकही अद्ययावत केला नव्हता, अन्नसुरक्षा योजनेतील तांदळाचा साठा ४२ किलोने कमी सापडला. आता येथील शिधापत्रिकाधारकांना नजीकच्या ११५ क्रमांकाच्या शिधावाटपात जाऊन शिधा घेता येणार असल्याचे मुख्य शिधावाटप अधिकारी मुळूक यांनी सांगितले.

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget