भाजपचे नवनिर्वाचित आमदार रमेश कराड यांच्यासह २२ जणांवर गुन्हा दाखल

बीड - विधानपरिषदेवरील भाजपचे नवनिर्वाचित आमदार रमेश कराड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीडमध्ये गोपीनाथ गडावर सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केल्याप्रकरणी कराड यांच्यासह २२ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.भाजप आमदार रमेश कराड यांनी परळी तालुक्यातील गोपीनाथ गड येथे भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी यांचा आदेश झुगारुन जमाव करत सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे.रमेश कराड यांनी गोपीनाथ गड येथे पोलीस प्रशासनाला कसलीही पूर्वकल्पना न देता अचानक दर्शनाला येऊन जमाव गोळा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. रमेश कराड यांच्यासह २२ जणांवर परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यावेळी कराड यांच्यासमवेत भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा डॉ. शालिनी कराड आणि १५ जण होते. 
रमेश कराड हे पंकजा मुंडे यांच्या अत्यंत जवळचे असल्याचे सांगण्यात येते. कराड यांनी दोन वर्षापूर्वीही विधानपरिषद निवडणुकीत मोठी खेळी केली होती. त्यावेळी त्यांनी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश करुन विधानपरिषदेचे तिकीट मिळवले होते. मात्र अवघ्या पाच दिवसात त्यांनी माघार घेत पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे धनंजय मुंडे यांची मोठी अडचण झाली होती. कारण त्यावेळी राष्ट्रवादीकडे उमेदवारच न उरल्याने अपक्षाला पाठिंबा देण्याची नामुष्की राष्ट्रवादीवर ओढवली होती.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget