रत्नागिरीत रुग्णांचा आकडा वाढला

रत्नागिरी - कोरोनाचा फैलाव वाढू लागल्याने जिल्ह्यातील नागरिकांची चिंता वाढू लागली आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव होऊ लागला आहे. गेल्या आठवडाभरात कोरोना बाधितांचा आकडा वाढला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. रेड झोन असणाऱ्या मुंबई आणि उपनगरातून कोकणमध्ये येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. तसतसा कोरोना बाधितांचा आकडा वाढताना दिसून येत आहे.कोरोना बाधितांचा आकडा ७४ वर पोहोचला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात आणखी २२ जण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मंडणगड ११, रत्नागिरी ७ आणि दापोलीतील ४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबईहून आलेल्या २२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह ७४ रुग्ण झाले आहेत.
जिल्ह्यात बाहेर गावावरुन येणाऱ्या लोकांमुळे कोरोना विषाणूचा प्रसार वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने चिंता व्यक्त केली आहे. मुंबई आणि उपनगरातून जिल्ह्यात आलेल्या लोकांमुळे कोरोना बाधितांची संख्या वाढत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत तिघांचे मृत्यू झाले आहेत. त्यामुळे चिंता अधिक वाढली आहे. ऑरेंज झोनमधून जिल्हा आता रेड झोनकडे वाटचाल करत असल्याने येथे निर्बंध कडक करण्याची गरज निर्माण झाली आहे, तशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. 

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget