मजुरांच्या रेल्वे तिकिटाचे पैसे काँग्रेस भरणार - सोनिया गांधी

मुंबई - लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या परराज्यातील नागरिकांना घरी जाण्यासाठी सरकारने परवानगी दिली आहे. मात्र, रेल्वे तिकीटाचे पैसे कोण भरणार? असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर स्थलांतरित मजुरांकडून रेल्वे तिकिटाचे पैसे घेण्याच्या मुद्दावरुन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली काँग्रेस या मजुरांच्या तिकिटांचे पैसे भरेल, असे सोनिया गांधी यांनी जाहिर केले आहे. त्यामुळे काँग्रेस नेते भाई जगताप यांनी सोनिया गांधी यांचे आभार मानले आहेत.
परराज्यातील मजूर आणि कामगार यांना लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल झाल्यानंतर बऱ्याच दिवसांनी त्यांच्या त्यांच्या घरी जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हे सर्व गरीब असून कोरोनामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे. याचा मानवतेच्या दृष्टीने विचार करून रेल्वेने त्यांच्याकडून तिकीट शुल्क आकारू नये, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीकडून केंद्राला केली आहे. पण, केंद्र लवकर निर्णय घेत नसल्यामुळे काँग्रेसने मजुरांना घरी सोडण्याचे भाडे देण्याचा निर्णय घेतला आहे.या मजुरांकडून रेल्वेने तिकीट आकारू नये, अशी मागणी काँग्रेसनेही केली होती. मात्र, ती मागणी अद्याप पूर्ण न झाल्याने या मजुरांच्या तिकीटाचा खर्च काँग्रेस स्वतः उचलणार आहे. तसे सोनिया गांधी यांनी जाहिर केले आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget