महाराष्ट्रात 'हिका' चक्रीवादळ धडकणार, कोकणात हाय अलर्ट

रत्नागिरी - पश्चिम बंगालमध्ये ‘अम्फान’ चक्रिवादळाने धुमाकूळ घातला होता मोठ्या प्रमाणात पश्चिम बंगालमध्ये नुकसान झाले होते. आता महाराष्ट्राला ‘हिका’ चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला. असून पुढच्या ४८ तासांत हे वादळ महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनाऱ्यावर धडकणार आहे. सिंधुदूर्ग आणि कोकण किनारपट्टीवरून हे वादळ जाणार असून गुजरातच्या किनारपट्टीलाही धोका असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्याने हे चक्रिवादळ निर्माण झालं आहे. ताशी १२० किमी वेगाने वारे वाहतील असे हवामान खात्याने म्हटले आहे. किनारपट्टीवर राहणाऱ्या लोकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. तर मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असंही हवामान खात्याने म्हटले आहे. ३ जूनच्या सुमारास हे वादळ गुजरातमधून महाराष्ट्रात येईल असेही हवामान खात्याने म्हटले आहे.सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या समुद्र किनाऱ्या जवळून चक्रीवादळ जाण्याचा इशारा मुंबई हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्याच बरोबर चक्रीवादळामुळे आपतकालिन परिस्थिती उद्भवल्यास खबरदारीच्या उपाययोजना करण्यासाठी सिंधुदूर्गचे पालकमंत्री उदय सामंत आज दुपारी १२ वाजता जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी दोन्ही जिल्ह्यांच्या समुद्र किनाऱ्यावर सतर्कता वाढवण्यात आल्याचेही पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget