रेल्वेने निर्णय बदलला, विशेष वर्गासाठी उघडणार तिकिट काऊंटर

नवी दिल्ली - रेल्वे स्थानकांवर तिकीट काऊंटर उघडणार नसल्याचे जाहीर करण्यात आले होते पण सोमवारी रात्री हा निर्णय बदलण्यात आला आहे. काही ठराविक स्थानकांवर ठराविक वर्गासाठी तिकिट काऊंटर सुरु राहणार आहेत. ज्या ठिकाणाहून ट्रेन सुटतील आणि ज्या ठिकाणी पोहोचतील अशा ठिकाणी तिकिट काऊंटर खुली राहणार आहेत. 
जनरल प्रवासी या ठिकाणाहून तिकिट घेऊ शकणार नाही. विशेष वर्गासाठी तिकिट काऊंटर खुले राहील असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले. विशेष रेल्वे मार्गावर खासदार, स्वातंत्र्य सैनिक यांना ही सुविधा असल्याचे रेल्वेने आपल्या ऑर्डरमध्ये सांगितले आहे. जनरल वर्गाच्या तिकिट या वेबसाईटद्वारेच मिळणार आहेत.दिव्यांग वर्गासाठी ३एसीमध्ये दोन जागा आरक्षित असतील. सध्याच्या आणि माजी खासदारांसाठी १ एसीमध्ये दोन जागा, २ एसीमध्ये चार जागा आरक्षित असतील. रुग्ण, विद्यार्थी, दिव्यांग व्यक्ती तिकिटमध्ये सवलत घेऊ शकतील. ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणती सवलत नसेल. 
सर्व प्रवर्गातील तिकिट १२ ते १७ मे म्हणजे १ आठवड्यापर्यंत बुक करता येणार आहेत. काल रात्री सव्वा नऊ वाजल्यापासून ३० हजार पीएनआर जनरेट झाले आहेत. ५४ हजारहून अधिक प्रवाशांनी रिझर्वेशन केले आहे. 

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget