स्वदेशी उत्पादनांसाठी बाबा रामदेव लाँच करणार ऑनलाइन पोर्टल

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी उत्पादनांसाठी ‘लोकसाठी व्होकल’ ही घोषणा केली होती.प्रत्येक भारतीयाला लोकलसाठी व्होकल बनायचे आहे. केवळ लोकलसाठी व्होकलच बनायचे नाहीतर लोकल वस्तूंची खरेदी करायची आहे व त्यांचा अभिमान बाळगून प्रचारही करायचा आहे, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले होते. त्यांच्या आवाहनाला योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदने स्वदेशी उत्पादनांसाठी ई कॉमर्स पोर्टल लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या धर्तीवरच हे पोर्टल काम करणार आहे.
बाबा रामदेव यांच्या कंपनीने ‘ऑर्डर मी’ या नावानं वेबपोर्टल लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. या पोर्टलवर पतंजलीशी निगडीत उत्पादनांच्या विक्री करण्यात येणार आहे. त्यासोबतच अन्य स्वदेशी उत्पादनांचीदेखील विक्री करण्यात येईल. याद्वारे विक्री करण्यात येणारी उत्पादनं ऑर्डर केल्यानंतर काही तासांमध्ये ग्राहकांपर्यंत पोहोचवली जाणार आहेत. तसेच घरपोच सेवाही मोफत दिली जाण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली इतकेच नाही तर या पोर्टलद्वारे मोफत वैद्यकीय सल्लादेखील देण्यात येणार आहे. पतंजलीशी निगडीत १ हजार ५०० जणांना याद्वारे संपर्क साधता येणार आहे. या महिन्याच्याच अखेरिस हे पोर्टल लाँच होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आचार्य बाळकृष्ण यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार आम्ही स्वदेशी वस्तूंचा वापर वाढवण्यासाठी काम करत आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केले.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget