चंद्रपूर जिल्ह्यातील.सर्वच दुकाने सोमवारपासून उघडणार - जिल्हाधिकारी

चंद्रपूर - मागील दोन महिन्यांपासून लॉकडाऊनच्या झळा सोसणाऱ्या चंद्रपूर जिल्हावासियांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. सोमवारपासून जिल्ह्यातील सर्वच दुकाने आता सोमवारपासून उघडणार आहेत. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी निर्देश दिले असून सकाळी दहा ते दुपारी दोन या दरम्यान ही दुकाने उघडता येणार आहेत. जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील विक्रेत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 
जीवनावश्यक सोयी सुविधा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश प्रशासनाने मागील काही दिवसांसाठी लॉकडाऊन दरम्यान दिले होते. यामध्ये बाजी मार्केट, किराणा दुकाने, मेडिकल शॉप, चिकन-मटण विक्री केंद्र आदींचा समावेश होता. मात्र, इतर दुकानांना मुभा देण्यात आली नव्हती. त्यामुळे अनेकांचा व्यवसाय ठप्प झाला होता. तसेच यावर निर्भर असलेल्या कुटुंबातील सदस्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.चंद्रपूर जिल्ह्यात केवळ एकच कोरोनाबाधित रुग्ण आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील संचारबंदीमध्ये शिथिलता आणावी, यासाठी प्रशासन प्रयत्नशील होते. त्यातच आता जिल्हा प्रशासनाने हा मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार सोमवारपासून जिल्ह्यातील सर्व दुकाने उघडण्याची मुभा देण्यात आली आहे. सकाळी दहा ते दुपारी २ या दरम्यान ही दुकाने उघडी राहणार आहेत. सोमवार ते शनिवारपर्यंत ही दुकाने उघडी राहतील. यामध्ये कपड्याची दुकाने, मोबाईल रिचार्ज, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल, चष्म्यांची दुकाने, सलून तसेच इतर दुकानांचा समावेश आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेताना यासोबतच लग्न समारंभासाठी देखील मोठी सूट दिली आहे. प्रशासनाच्या परवानगीने आता ५० लोकांना लग्न सोहळ्याला उपस्थित राहता येईल. यापूर्वी ही परवानगी फक्त २० नागरिकांसाठी होती. मात्र, या परवानगीसाठी उपविभागीय कार्यालयात संपर्क साधावा लागणार आहे. एकंदरीत ठप्प पडलेला व्यवसायाचा गाडा आता पुन्हा सुरू होणार आहे. असे असले तरिही नागरिकांना विनाकारण बाहेर पडण्यास बंदी कायम आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी सांगितले आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget