मुंबईतील नेपियनसी रोड येथील इमारतीला आग

मुंबई - मुंबईत आज उच्चभ्रू नेपियन सी रोडवरील एका इमारतीला भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच काही वेळाने अग्निशमन दलाचे बंब आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. इमारतीमध्ये अनेक रहिवासी अडकले होते.इमारतीच्या सहाव्या मजल्यावर ही आग लागली. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना इमारतीमध्ये अडकलेल्या सर्व कुटुंबांना बाहेर काढण्यात यश मिळाले आहे. 
या घटनेत कोणत्याही प्रकारची जिवितहानी झालेली नाही. मजल्यावर अडकेल्या दोन महिलांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. अजूनही बचावकार्य सुरू आहे. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
या मजल्यावरून धुराचे लोट बाहेर पडत होते. याशिवाय मजल्यावर आगीमुळं कमालीची उष्णता होती. यापूर्वी २१ एप्रिल रोजी मुंबईच्या नागपाडा येथे भीषण आग लागण्याची घटना घडली होती. दोन आठवड्यांत मुंबईत आग लागण्याची ही दुसरी घटना आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget