भाजपच्या आयटी सेलवर कारवाई करा - सचिन सावंत यांची मागणी

मुंबई - करोना व्हायरसची साखळी तोंडण्यासाठी लॉकडाउन ४.० सुरु असताना आता सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपामध्ये क्वारंटाइनच्या सुविधेवरुन आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. भाजपा महाराष्ट्रने त्यांच्या अधिकृत टि्वटर हँडलवरुन एक व्हिडीओ टि्वट केला. त्यावरुन हे राजकारण रंगले आहे. क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आलेले नागरिक तिथल्या सोयी-सुविधांवरुन जाब विचारतानाच एक व्हिडीओ आहे.
महाराष्ट्रातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. लॉकडाऊन ४ सुरू झाले पण राज्य सरकार अजूनही काही ठोस पाऊलं उचलताना दिसत नाही व नियोजनाचा अभाव जाणवत असल्यामुळे सामान्य जनता व करोना वॉरियर्स सुद्धा त्रस्त झाले आहे असे व्हिडीओसोबत भाजपाने टि्वट केले आहे.
यावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी उत्तर दिले आहे. महिन्याभरापूर्वीचा व्हिडिओ टाकून जनतेमध्ये असंतोष पसरवण्याचा महाराष्ट्र भाजपाचा हा कुटील डाव आहे. हा खोटारडा प्रकार संतापजनक आहे. त्यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे भाजपाच्या आयटी सेलवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget