कठीण परिस्थितीवर विजय मिळवला पाहिजे - पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली - बुद्धपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित केले. यावेळी त्यांनी म्हटले की मानवाने कठीण परिस्थितीचा निरंतर सामना करून त्यावर विजय मिळवला पाहिजे, ही भगवान बुद्धांची शिकवण आपण आज अंमलात आणण्याची गरज असल्याचे सांगितले. , जगात सध्या कोरोनामुळे जगात प्रचंड उलथापलथ सुरु आहे. अशा परिस्थितीमुळे निराशा येणे स्वाभाविक आहे. मात्र, अशावेळी आपण भगवान बुद्धांची शिकवण आठवली पाहिजे. त्यांनी गोष्टी आहे त्या स्वरुपात स्वीकारा, असे सांगितले होते.भारत सध्या कठीण परिस्थितीमधून बाहेर पडण्यासाठी निरंतर प्रयत्न करत असल्याचे मोदींनी यावेळी सांगितले. 
भारत निस्वार्थीपणे संकटात असलेल्यांना मदत करत असल्याचेही मोदींनी सांगितले. त्यामुळेच संकटाच्या काळात जगातील अनेक देशांना भारताची आठवण होत असल्याचे मोदींनी सांगितले. सध्याच्या कोरोनाच्या संकटाच्या काळात अनेक लोक कायदा सुव्यवस्था सांभाळणे, स्वच्छता राखणे आणि लोकांना बरे करण्याचे काम २४ तास करत आहेत. हे लोक आपल्यासाठी त्याग करत आहेत. या लोकांचे आभार मानणे गरजेचे असल्याचे मोदींनी सांगितले.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget