योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी

लखनऊ - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. सोशल मीडिया डेस्कच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर धमकीचा मेसेज मिळाला आहे.मुख्यमंत्री योगी यांना मी बॉम्बने उडवणार आहे, अशी धमकी देत एका विशेष समुदायासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ शत्रू बनले असल्याचे या मेसेजमध्ये म्हटलं आहे. या प्रकरणी गोमती नगर पोलिस स्टेशनमध्ये कलम ५०५ (१)b ५०६,आणि ५०७नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
८८२८४५३३५० या क्रमांकावरून गुरुवारी रात्री १२.३२ वाजता उत्तर प्रदेश ११२ हेल्प डेस्कच्या ७५७००००१०० या व्हॉट्सअॅप क्रमांकावर हा धमकीचा मेसेज पाठवण्यात आला. पोलिस या मोबाइल क्रमांकाचा शोध घेत आहेत, अशी माहिती गोमती नगर पोलिस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक धीरजकुमार यांनी दिली आहे. या प्रकरणाची चौकशी एसटीएफकडे सोपवण्यात आली आहे.आरोपीच्या संदर्भात पोलिसांना अनेक माहिती मिळाली आहे. पोलिस या प्रकरणी आरोपीचा शोध घेत असल्याची माहिती लखनऊचे पोलिस आयुक्त सुजीत पांडे यांनी सांगितलं आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget