राजकीय घडामोडींना वेग,नाना पटोले दिल्लीत दाखल

नवी दिल्ली - कोरोनाच्या संकट काळात राज्यात राजकारण चांगलेच तापले आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे संकट असताना दुसरीकडे राष्ट्रपती राजवटीबाबतही चर्चा सुरु आहे. महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती आणि यादरम्यान सुरु असलेल्या राजकीय स्थितीबाबत चर्चा करण्यासाठी नाना पटोले दिल्लीत आल्याची चर्चा आहे.
सोमवारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनात दाखल झाले होते. त्यांची ही भेट सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात आले. शरद पवारांनंतर नारायण राणे राजभवनात राज्यपालांच्या भेटीसाठी दाखल झाले होते. राज्यपालांसोबतच्या भेटीदरम्यान नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे सरकारवर जोरदार टीकास्त्रही सोडले होते. ठाकरे सरकार कोरोनाचा सामना करण्यात अपयशी ठरलं आहे. त्यामुळे या सरकारला नारळ द्यावा आणि राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी नारायण राणे यांनी केली होती. पैसे कसे उभे करायला पाहिजेत आणि पोलीस यंत्रणा कशी हलवली पाहिजे यांचे ज्ञान या सरकारला नाही, नाचता येईना, अंगण वाकडे अशी सत्ताधाऱ्यांची अवस्था असल्याचेही राणे म्हणाले होते.
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याच्या मुद्द्यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी, महाराष्ट्रात आम्ही सरकारमध्ये आहोत. पण मोठे निर्णय घेण्याचे आम्हाला अधिकार नाहीत. पण महाराष्ट्रातले सरकार मजबूत आहे आणि आमचा त्यांना पाठिंबा आहे असे ते म्हणाले. त्यामुळे महाराष्ट्रातील या सर्व पार्श्वभूमीवर नाना पटोले दिल्ली आटीला गेल्याची खबर आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget