कोरोनाबाधित मृतदेहांच्या दफनविधीचा मार्ग मोकळा

मुंबई - एखाद्या व्यक्तीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारही प्रतिष्ठेने व्हायला हवा.असे नमूद करत कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या दफनविधीविरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या. 
कोरोना बाधितांच्या मृतदेहातून या विषाणूचे संक्रमण होत असल्याचा कुठलाही शास्त्रीय पुरावा नाही. शिवाय कोरोनाबाधितावर कोणत्या स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार करायचे वा कुठल्या कब्रस्तानात दफनविधी करायचा याचा निर्णय घेण्याचा पालिकेला सर्वस्वी अधिकार आहे, असेही मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती एस. एस. शिंदे यांच्या खंडपीठाने नमूद केले. न्यायालयाच्या या निर्णयामुळे कब्रस्तानमधील विशेषत: वांद्रे येथील बडा कब्रस्तानमध्ये कोरोनाबाधितांच्या मृतदेहाचा दफनविधी करण्यातील अडथळा दूर झाला आहे.वांद्रे येथील बडा कब्रस्तानप्रकरणी याचिका करणाऱ्याला दंड सुनावण्याची तयारीही न्यायालयाने दाखवली होती. मात्र सध्याच्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने दंड सुनावण्यापासून स्वत: रोखले.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget