विशाखापट्टणममध्ये गॅस गळतीमुळे ७ जणांचा मृत्यू

विशाखापट्टणम - आंध्र प्रदेशातील के. आर. आर. व्यंकटपुरम गावात LG पॉलिमर औद्योगिक इमारतीत गॅस गळती झाल्याने मोठी दुर्घटना घडली आहे या गॅस गळतीमुळे ७ जणांचा मृत्यू झाला असून ५००० हून अधिक लोक आणि प्राण्यांची प्रकृती बिघडली आहे. तीन जणांची प्रकृती अत्यावस्थ असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. तर २०० जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. हा गॅस जवळपास ३ किलोमीटरपर्यंत पसरत गेला. ५ गावं पूर्णपणे रिकामी करण्यात आली आहेत. या गॅस गळतीचा फटका ९ गावांना बसल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget