पीएम मोदी ८३ दिवसानंतर प्रथमच दिल्लीबाहेर ; पश्चिम बंगालमध्ये पाहणी करणार

कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये अम्फान या चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पाहणी दौरा करण्यासाठी दाखल झाले आहेत. गेल्या २८३ वर्षातील हे सर्वात भयंकर वादळ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अम्फान बाधित भागाची हवाई पाहणी करणार आहेत. पंतप्रधान मोदी कोलकाता येथे पोहोचले आहेत. तिथे ममता बॅनर्जी यांनी त्यांचे स्वागत केले. आता अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार असून त्यानंतर पंतप्रधान आणि मुख्यमंत्री हवाई पाहणी करणार आहेत.
शुक्रवारी सकाळपर्यंत पश्चिम बंगालमध्ये अम्फानच्या वादळामुळे ८० जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याचे सुमारे १ लाख कोटी रुपयांचे नुकसान होण्याचा अंदाज आहे.अम्फानच्या वादळामुळे ओडिशामध्येही नुकसान झाले आहे. बंगालच्या तुलनेत तेथे कमी नुकसान झाले आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटनुसार पीएम मोदी ओडिशामध्ये ही झालेल्या नुकसानीचा हवाई पाहणी करणार आहेत.पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान मोदींना राज्यात येण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर काही तासांनंतरच पंतप्रधान मोदींनी पश्चिम बंगाल दौरा करण्याचा निर्णय घेतला.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget