संकटकाळात पोलीस एकटे नाही, सरकार त्यांच्या सोबत - अनिल देशमुख

मुंबई - राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत सहा पोलिसांचा मृत्यू झाला आहे. यामुळे पोलिसांच्या मनोबलावर परिणाम होईल, असे म्हंटले जात आहे. मात्र, कठीण काळात पोलिसांची कार्यक्षमता दुप्पट झाली आहे. या लढाईत ते एकटे नसून सरकार त्यांच्याबरोबर आहे, असे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले. तसेच कोरोनामुळे मृत्यू झालेले एएसआय सुनील दत्तात्रय कलगुटकर यांना श्रद्धांजली वाहिली.
२६/११ चा दहशतवादी हल्ला आणि मुंबईला बुडवणारा २००५ चा महापूर, यावर देशमुखांनी प्रकाश टाकला. महाराष्ट्र पोलीस नेहमीच जीव धोक्यात घालून नागरिकांना मदत करण्यासाठी हातभार लावतात. आता कोरोना साथीच्या रुपाने पुन्हा एकदा संकट आले आहे. त्यासाठी पोलीस कर्मचारी कोरोनाच्या हॉटस्पॉट भागात देखील कायदा व सुव्यवस्था राखत आहेत, असे गृहमंत्री म्हणाले.पोलीस दलाविषयी आदर म्हणून आपल्या सोशल मीडिया अकाऊंटचा डीपी मुंबई पोलीस दलाचा लोगो ठेवण्याचे आवाहन गृहमंत्र्यांनी केले होते. याला चांगला प्रतिसाद मिळाला असून तळागाळातील कार्यकर्ते, गृहिणी, महाविद्यालयीन विद्यार्थी, राजकीय कार्यकर्ते, क्रिडापटू, सुप्रसिद्ध बॉलीवूड कलाकार या सर्वांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटचे डीपी बदलले.
अनेक नामांकित व्यक्तींनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटचे डीपी बदलले आहे. 

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget