मुंबईत पोलिसांवर कोयत्याने हल्ला; तरुणाला अटक

मुंबई - कोरोना संकटाच्या काळात मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरात कर्तव्य बजावणाऱ्या दोन पोलिसांवर एका तरुणाने हल्ला केल्याची घटना घडली आहे. हल्लखोर तरुणाला अटक करण्यात आली असून जखमी पोलिसांवर उपचार सुरू आहेत. मरिन ड्राईव्ह परिसरात प्रदीप नायर नावाच्या तरुणाने पोलिसांवर हल्ला केला. रात्री दीड वाजता ही घटना घडली. हा तरुण ब्रीच कँडी जवळील सिल्व्हर ओक इस्टेट परिसरात राहत असल्याची माहिती मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मृत्यूंजय हिरेमठ यांनी दिली. प्रदीप नायरने नाकाबंदीवर असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर कोयत्याने हल्ला केला. या कर्मचाऱ्यांच्या खांद्याला आणि हाताला दुखापत झाली. त्यांच्यावर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 
प्राणसुखलाल मफतलाल हिंदू स्विमिंग बाथ अँड बोट क्लबजवळ शुक्रवारी रात्री काही पोलीस कर्मचारी नाकाबंदीचे कर्तव्य बजावत होते. त्यावेळी एक तरुण हातात कोयता घेऊन येत असल्याचे त्यांनी पाहिले. पोलिसांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तो पळू लागला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. त्यावेळी त्याने पोलिसांवर कोयत्याने हल्ला केला, अशी माहिती हिरेमठ यांनी दिली. 
अटक करण्यात आलेला तरुण वास्तुविशारद असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्यावर कलम ३०७ सह भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांच्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हल्लेखोर तरुण कोयता घेऊन बाहेर का पडला? याचा तपास होईल. पोलिसांवरील हल्ला सहन केला जाणार नाही. मुंबई पोलीस आयुक्तांशी या प्रकरणी तातडीणे बातचीत करणार असल्याचे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी सांगितले आहे. पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारादेखील त्यांनी दिला.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget