देवेंद्र फडणवीसांचा महाआघाडी सरकारवर गंभीर आरोप

मुंबई - महाराष्ट्रापुढे कोरोनाचे मोठे संकट उभे असताना देखील राजकीय आरोप प्रत्यारोप सुरूच आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते. त्यानंतर भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पवारांवर टीका केली आहे. तसेच, 'कोरोनाची परिस्थिती राज्य सरकारकडून योग्यरित्या हाताळली जात नाही, अनेकांना उपचार मिळत नाहीत', असा आरोपही फडणवीसांनी केला.विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलत असताना फडणवीस यांनी महाविकासआघाडी आणि शरद पवार यांच्यावर टीका केली. 'देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण हे महाराष्ट्रात आहे. कोरोनाचा सामना राज्य सरकारकडून योग्यरित्या होत नाही, अनेकांना उपचार मिळत नाहीत', असा गंभीर आरोप फडणवीस यांनी केला.'राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मदतीसाठी पत्र लिहितात, त्यांनी एखादे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही लिहावे. राज्य सरकारकडून उपाययोजना नाही, केवळ राजकारण सुरू आहे', अशी टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी केली.'आम्ही सरकारला मदत करण्यास तयार आहे, आमची मदत नको असेल तर त्यांनी उपाययोजना कराव्या. राज्य सरकारला जी मदत हवी असेल ती करू, त्यांनी आम्हाला सांगावे, आम्ही पाठीशी उभे राहू, मात्र मुख्यमंत्र्यांनी पहिली बैठकच दोन महिन्यांनी घेतली, आम्ही तर सहकार्य करायला तयारच आहे, त्यामध्ये केवळ औपचारिकता नको', अशी टीकाही फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली.'केंद्राने एवढे मोठे पॅकेज दिले, तरीही यांचे केंद्राकडे बोट आहे. मग ते राजकारण नाही आणि आम्ही सूचना मांडल्या की आमचं राजकारण कसे? मुळात केंद्राने ८५ टक्के तिकिटाचे पैसे दिले, राज्याने १५ टक्के द्यायचे होते. मात्र, महाराष्ट्रातील अज्ञानी मंत्र्यांना रेल्वेच्या खर्च किती येतो हेच माहित नाही. त्यामुळे महाराष्ट्र बचाव ही भाजपची भूमिका घेऊन राज्यपाल यांना निवेदन दिले आहे', अशी माहिती त्यांनी दिली.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget