महापालिका आयुक्तपदावरून बदलीनंतर प्रविण परदेशींचा रजेसाठी अर्ज

मुंबई - मुंबई महापालिका आयुक्तपदावरून उचलबांगडी झालेल्या प्रविण परदेशी यांनी रजेसाठी अर्ज केल्याची माहिती हाती आली आहे. ई मेलद्वारे परदेशी यांनी सरकारकडे रजेसाठी अर्ज केला आहे. प्रविण परदेशींनी बदली झाल्यानंतर नगरविकास विभागात अतिरिक्त मुख्य सचिव पदाचा पदभार स्वीकारला आणि त्यानंतर रजेचा अर्ज केला. परदेशी यांची बदली नगरविकास विभागात अतिरिक्त मुख्य सचिव पदी झाली होती.परदेशींनी केलेला अर्ज अद्याप स्वीकारला गेलेला नाही. शनिवारी आणि रविवारी मंत्रालयाला सुट्टी असल्यामुळे परदेशींचा रजेचा अर्ज सोमवारी स्वीकारला जाण्याची शक्यता आहे. परदेशी यांच्या बदलीमागे मुख्य सचिव अजय मेहता आणि त्यांच्यात असलेले मतभेद कारणीभूत असल्याची चर्चा आहे.त्याचबरोबर मुंबईतील हाताबाहेर जाणारी कोरोनाची स्थिती, प्रशासनात नसलेला समन्वय, आरोग्य व्यवस्था सुधारण्यात आलेलं अपयश, लॉकडाऊनबाबत काढलेले वेगवेगळे आदेश यावरून मुंबईत गोंधळाच वातावरण आहे. त्यातच सायन रुग्णालयात रुग्णांच्या वॉर्डमध्ये कोरोनाचे मृतदेह ठेवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि मुंबई महापालिका आणि राज्य सरकावर जोरदार टीका होऊ लागली. परदेशींच्या बदलीचे हे तत्कालीन कारण ठरले. आता नाराज असलेल्या परदेशींनी रजेसाठी अर्ज टाकला, त्यापुढे ते काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget