सर्व मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर लॉकडाऊन ४ चे नियम ठरवणार

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री देशाला संबोधित करताना २० लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले आणि त्याचवेळी लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याचे ही संकेत दिले. ते म्हणाले की लॉकडाउन पूर्णपणे वेगळ्या आणि नवीन नियमांसह असेल. यासाठी राज्यांकडून सूचनाही मागविण्यात आल्या आहेत, त्या आधारे १८ मेपूर्वी लॉकडाऊन ४ ची माहिती दिली जाईल. अशा परिस्थितीत राज्यांना लॉकडाऊनचे नियम ठरवावे लागतील असे पंतप्रधानांनी सर्व राज्यांना सल्ला दिला आहे.
पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित करताना म्हटलं की, 'शास्त्रज्ञ म्हणतात की कोरोना दीर्घकाळ आपल्या आयुष्याचा एक भाग राहील, परंतु आम्ही आमचे आयुष्य यामुळे कमी होऊ देणार नाही. आम्ही मास्क घालू आणि अंतर ठेवू. परंतु लक्ष्यावर परिणाम होऊ देणार नाही. पंतप्रधानांच्या या विधानाचा अर्थ असा आहे की कोरोना संसर्गापासून सावधगिरी बाळगून आर्थिक उलाढाली सुरू कराव्या लागतील.कोरोनाला सामोरे जाण्यासाठी देशात राबविण्यात आलेल्या लॉकडाउनचा कालावधी १७ मे रोजी संपणार आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदी म्हणाले की लॉकडाउन ४ नवीन नियमांसह एक नवीन रूप असेल. आम्ही राज्यांकडून ज्या सूचना घेत आहोत त्यासंबंधित माहिती आपल्याला १८ मेपूर्वी देण्यात येईल.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget