अर्भकाला फेकणाऱ्या मातेसह प्रियकराला अटक

नांदेड - कंधार तालुक्यातील फुलवळ शिवारातील एका शेतात पाच दिवसांचे अर्भक आढळले होते. हे अर्भक शेतात फेकून देण्यात आले होते. शेतकऱ्याच्या सतर्कतेमुळे या अर्भकाचा जीव वाचला होता. या प्रकरणातील आरोपीचा शोध घेऊन पोलिसांनी मातेसह अन्य एकाला अटक केली आहे.
फुलवळ एमआयडीसीच्या शेजारी राजानंद नारायणराव मंगनाळे यांच्या शेतात नवजात पुरुष जातीचा अर्भकास सूती स्कार्फमध्ये गुंडाळून त्याचा चेहरा वगळता बाकी शरीराभोवती मातीचा ढिगाऱ्यात लपवून अज्ञातांनी पलायन केले होते. हे अर्भक केवळ पाच दिवसांचे होते. हा प्रकार अनैतीक संबंधातून घडल्याचा दाट संशय पोलिसांना होता. अखेर त्या अर्भकाच्या आईचा पोलिसांनी शोध लावला.
या बाळाच्या आईला शोधण्यासाठी १५ दिवसांपासून कंधारचे पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करण्यात आले होते. संतोष काळे, बजरंग जाधव, पी. सी. तलवार, राजश्री गुट्टे, कविता यांच्या पथकाने शोध सुरू केला होता. या पथकाने पानशेवडी आरोग्य उपकेंद्रात जाऊन सगळी तपासणी केली असता उपकेंद्रांमध्ये १३ मेपासून किती मुले जन्माला आली त्याची माहिती संतोष काळे व सहकाऱ्यांनी घेतली व तपासाची चक्रे फिरवली. २२ मे रोजी तालुक्यातील दैठणा येथील या चिमुकल्याची आई व तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली. या महिलेचे अनैतिक संबंध होते. हत्येच्या गुन्ह्यात या महिलेचा पती कारागृहात आहे तर तिला १४ वर्षांची मुलगीही असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. या प्रकरणी अर्भकाला फेकणाऱ्या मातेसह तिच्या प्रियकराला कंधार पोलिसांनी अटक केली आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget