परदेशांत अडकलेले भारतीय मायदेशी परतणार

यूएई, यूके, यूएसए, कतार, सौदी अरेबिया, सिंगापूर, मलेशिया, फिलिपिन्स, बांगलादेश, बहारेन, कुवैत आणि ओमान या तेरा देशांमधून भारतीयांना मायदेशी परत आणले जाणार आहे.
नवी दिल्ली - ‘कोरोना’ विषाणूच्या प्रादुर्भावामुळे विविध देशांमध्ये अडकलेल्या सुमारे १४ हजार ८०० भारतीय नागरिकांना परत आणण्याच्या हालचाली मोदी सरकारने सुरु केल्या आहेत. लॉकडाऊनच्या काळात या नागरिकांना परत आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने आराखडा तयार केला आहे. ७ ते १३ मे या आठवड्याभराच्या कालावधीत ६४ विमानांनी टप्प्याटप्प्यात जवळपास १५ हजार भारतीय मायदेशी परत येतील.पहिल्या दिवशी म्हणजेच गुरुवार ७ मे रोजी दहा विमानांच्या उड्डाणांनी २३०० भारतीय परतणार आहेत. दुसर्‍या दिवशी नऊ देशांतील २०५० भारतीय नागरिक चेन्नई, कोची, मुंबई, अहमदाबाद, बंगळुरु आणि दिल्लीला परत जातील. तिसर्‍या दिवशी १३ देशांतील अंदाजे २०५० भारतीय चेन्नई, कोची, मुंबई, लखनौ आणि दिल्लीला परततील. चौथ्या दिवशी अमेरिका, यूएई आणि लंडनहून १८५० भारतीयांना परत आणण्याची योजना आहे.
७ ते १३ मे दरम्यान भारतातून यूएईसाठी १०, यूएस आणि ब्रिटनसाठी प्रत्येकी सात, सौदी अरेबिया आणि सिंगापूरला प्रत्येकी पाच, तर कतारसाठी दोन विमानांचं उड्डाण होईल.बांगलादेश आणि मलेशियाला प्रत्येकी सात, तर कुवैत आणि फिलीपिन्सला प्रत्येकी पाच उड्डाणे होतील। या व्यतिरिक्त ओमान आणि बहारेनसाठी प्रत्येकी दोन उड्डाणे होणार आहेत.६४ उड्डाणांपैकी केरळमधून १५, दिल्ली आणि तामिळनाडूहून प्रत्येकी ११, महाराष्ट्र आणि तेलंगणा येथून प्रत्येकी सात, तर उर्वरित उड्डाणे पाच इतर राज्यांमधून होतील. अमेरिकेत मोठ्या संख्येने भारतीय विद्यार्थी आणि पर्यटक अडकले असल्याने येत्या आठवड्यात विमानांची संख्या वाढवली जाऊ शकते.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget