कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात मोफत कोरोना चाचण्या

कल्याण/डोंबिवली - कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात मोठया संख्येने कोरोना चाचण्या मोफत केल्या जात आहेत. खासगी लॅबमध्ये ज्या नागरिकांना स्वखर्चाने टेस्ट करावयाची आहे, अशा नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या असतानाही काहीजण महापालिका जास्त दराने कोरोनाची टेस्ट करत असल्याचा आरोप करत आहे. महापालिका क्षेत्रातील जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप पालिका प्रशासनावर होत आहे.
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रातील नागरिकांना सुरुवातीच्या कालावधीत कस्तुरबा रुग्णालय, मुंबई येथे तपासणी करीता जावे लागत असे. महापालिकेतर्फे एक एप्रिलपासून महापालिकेच्या तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत रुग्णांचे स्वॅब घेऊन ते मुंबई येथील हाफकिन इन्स्टिटयुट या ठिकाणी पाठवून नागरिकांचे विनामुल्य रिपोर्ट महापालिकेमार्फत देण्यात येत आहेत. महापालिकेने तापाचे दवाखाने सुरू केले आहेत. झोपडपट्टी भागात देखील सर्व्हेक्षण सुरू आहे. तापाच्या दवाखान्यात, तसेच सर्व्हेक्षणात आढळलेले व पॉझिटिव्ह रुग्णांचे जवळचे नातेवाईक यांना टाटा आमंत्रा येथे दाखल करुन घेऊन त्यांचे स्वॅब घेतले जातात व हाफकिन संस्थेकडे पाठवून मोफत टेस्ट केली जाते.ज्या नागरिकांना टाटा आमंत्रा येथे ॲडमिट होऊन टेस्ट करायची नसते व स्वखर्चाने ऐच्छिक खासगी लॅबमध्ये टेस्ट करावयाची असते अशा नागरिकांसाठी खासगी लॅबमध्ये टेस्ट करण्याची सुविधा महापालिकेमार्फत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच पिवळे व केसरी रेशन कार्डधारक यांना मोफत स्वॅबची तपासणी उपलब्ध करुन दिली आहे. सद्यस्थितीत बाई रुक्मिणीबाई रुग्णालय येथे महापालिका क्षेत्रातील ज्या नागरिकांना खासगी लॅबमध्ये टेस्ट करावयाची आहे, त्यांचेकरिता क्रस्ना डायग्नोस्टिक मार्फत तीन हजारात महापालिका क्षेत्रातील नागरिकांना टेस्ट करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
आत्तापर्यंत शास्त्रीनगर रुग्णालयात ३२० स्वॅब व टाटा आमंत्रा कोविड केअर सेंटर येथे ११७५ स्वॅब असे मिळून १४९५ नागरिकांच्या स्वॅबची तपासणी मोफत करण्यात आलेली आहे. तसेच खासगी लॅबमध्ये १,६५४ नागरिकांनी ऐच्छिक टेस्ट करुन घेतली आहे. महापालिकेच्या शास्त्रीनगर व टाटा आंमत्रातील रुग्ण तसेच तापाचे दवाखान्यातील रुग्णांसाठी विनामुल्य स्वॅब घेण्याची सुविधा उपलब्ध करुन दिल्याचेही सांगण्यात आले.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget