सरकारी रुग्णालयाची अवस्था अंधार कोठडीपेक्षाही भयंकर ; गुजरात सरकारला न्यायालयाने फटकारले

अहमदाबाद - देशात करोना व्हायरसने थैमान घातले असून,करोनामुळे गुजरातमधील परिस्थितीही चिंताजनक होत चालली आहे. गुजरातमध्ये करोनाचा मृत्यूदर काळजी वाढवणारा असून, परिस्थिती नियंत्रणात असल्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून होत आहे. कृत्रिम नियंत्रणाच्या प्रयत्नावरून गुजरात उच्च न्यायालयाने रुपाणी सरकारला फैलावर घेत कान टोचले आहे. अहमदाबादमधील शासकीय रुग्णालयातील परिस्थितीवरून न्यायालयाने सरकारला खडे बोल सुनावले.सरकारी रुग्णालय एखाद्या अंधार कोठडीसारखं आहे. त्यापेक्षाही भयानक स्थिती आहे,असे न्यायालयाने म्हटले आहे.
अहमदाबादमध्ये करोनावर उपचार करणारं मुख्य शासकीय रुग्णालय आहे. या रुग्णालयात आतापर्यंत ३७७ रुग्णांचा मृत्यू झाला असून, राज्यातील एकून मृत रुग्णांच्या तुलनेत रुग्णालयातील मृतांचे प्रमाण ४५ टक्के इतकं आहे. राज्यातील करोना नियंत्रणाबरोबर रुग्णांना उपचार मिळण्याविषयी गुजरात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकावर न्यायमूर्ती जे. बी. परदीवाला आणि इलेश व्होरा यांच्या खंठपीठासमोर सुनावणी झाली.
या याचिकांवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने गुजरातमधील करोना परिस्थितीची तुलना बुडणाऱ्या टायनिक जहाजाशी केली. सरकारी रुग्णालयातील परिस्थिती खूप दयनीय आहे. अहमदाबादमधील शासकीय रुग्णालयातील सोयी सुविधा अत्यंत निकृष्ट असल्याचे दिसून आले आहे. त्याबद्दल न्यायालयाला वाईट वाटत आहे. सरकारी रुग्णालय म्हणजे रुग्णांवर उपचार करणे, असे काही दिवसांपूर्वी न्यायालयाने म्हटले होते . पण, आज असे दिसते की सरकारी रुग्णालय अंधारकोठडीसारखेच आहे.अशा शब्दात न्यायालयाने गुजरात सरकारला फटकारले.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget