मुंबईतील कोरोना रोखण्याची जबाबदारी मंत्र्यांवर

मुंबई - मुंबईमध्ये वाढणारी कोरोनाची संख्या रोखण्यासाठी आता राज्य सरकारने नवीन रणनिती आखली आहे. मुंबईत कोरोनाला अटकाव करण्याची जबाबदारी आता मंत्र्यांवर सोपवण्यात आली आहे. मुंबईच्या ज्या भागांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या जास्त आहे, त्या भागातील स्थिती आटोक्यात आणण्यासाठी मंत्र्यांना जबाबदारी देण्यात येणार आहे. 
मुंबईमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्ण संख्येनुसार मुंबईचे विभाग पाडण्यात येणार आहे. या प्रत्येक विभागाची जबाबदारी एका मंत्र्यावर सोपवण्यात येणार आहे. संबंधित विभागात अन्नधान्य देणे, रुग्णांची व्यवस्था करणे, क्वारंटाईन व्यवस्था, आरोग्य सुविधा यांचा समन्वय करण्याची जबाबदारी मंत्री पार पाडणार आहे. मुंबईची जबाबदारी दिली जाणाऱ्या मंत्र्यांमध्ये नवाब मलिक, वर्षा गायकवाड, आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख यांचा समावेश असल्याची माहिती आहे. 
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget