दहावीच्या भूगोलाच्या पेपरबाबत बोर्डाचा महत्त्वाचा निर्णय

पुणे - लॉकडाऊनमुळे रद्द झालेल्या दहावीच्या भूगोलाच्या पेपरबाबत राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना भूगोल विषयाचे सरासरी गुण देण्यात येणार आहेत. कोरोनामुळे भूगोलाचा पेपर रद्द झाला होता. त्यामुळे आता इतर विषयांच्या गुणांची सरासरी काढून भूगोल विषयाला गुण दिले जाणार आहेत.राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाने याबाबतची माहिती दिली. याशिवाय दिव्यांग विद्यार्थ्यांना कार्यशिक्षण विषयाचे गुणही सरासरीनुसार मिळणार आहेत.
राज्यात दहावीची परीक्षा ३ मार्च ते २३ मार्च २०२० दरम्यान नियोजित होती.सर्व पेपर झाल्यानंतर केवळ भूगोलाचा पेपर बाकी होता. मात्र कोरोना संकटामुळे हा पेपर आधी पुढे ढकलण्यात आला, मग शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी हा पेपर रद्द करत असल्याची घोषणा केली.
याआधी, शिक्षण विभागाने पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांची पुढील इयत्तेत वर्णी लागली होती. परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्या पार्श्वभूमीवर पहिला लॉकडाऊन सुरुवातीला ३० एप्रिलपर्यंत वाढवल्याने त्यावेळी भूगोलाचा पेपर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
दरम्यान दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या निकालाबाबत सोशल मीडियावर अफवा पसरत आहेत. महाराष्ट्रातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनाही आपल्या निकालाची चिंता आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील दहावी आणि बारावीच्या निकालाच्या चुकीच्या तारखा व्हॉट्सअॅपसह सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र निकालाच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत, त्यामुळे या तारखांवरील अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन राज्य शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी केले आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget