कोरोनावर चेन्नईमध्ये तयार केलं औषध ; कर्मचाऱ्याने स्वतःवर केली चाचणी झाला मृत्यू

चेन्नई - देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. दुसरीकडे कोरोनावर अद्याप कोणतीही लस किंवा औषध मिळालेले नाही आहे. दरम्यान,जगामधील डॉक्टर सध्या वेगवेगळी औषधं तयार करत आहे. या सगळ्यात चेन्नईमधील एका कर्मचाऱ्याचा संशोधनादरम्यान मृत्यू झाला. कोरोनाच्या उपचारासाठी बनवलेल्या औषधाची चाचणी या हर्बल प्रोडक्ट बनवणाऱ्या कंपनीतील एका कर्मचाऱ्याने स्वत:वर केली. मात्र त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. 
तामिळनाडूतील ही हर्बल कंपनी सर्दीवर औषधं तयार करण्यासाठी ओळखली जाते. वृत्तानुसार, मृत व्यक्तीला औषधाचे ज्ञान असून तो कंपनीत प्रोडक्शन मॅनेजरच्या पोस्टवर होता. कोरोनावर मात करण्यासाठी त्यांनी एक औषध तयार केले होते. मात्र या औषधाची चाचणी मृत व्यक्तीने आणि त्याच्या बॉसने स्वत:वर केली. मात्र काही वेळातच त्यांची प्रकृती ढासळली. दोघही चक्कर येऊन कोसळले, त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. 
दरम्यान, या प्रोडक्शन मॅनेजरच्या मृत्यूनंतर त्याने जास्त प्रमाणात औषध घेतल्याचे समोर आले. त्यामुळे त्या औषधाचा थेट परिणाम त्यांच्या शरीरावर झाला. तर, त्याच्या बॉसवर उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget