वानखेडे, ब्रेबॉर्न स्टेडियमवर 'कोविड सेंटर' उभारण्यासाठी आदित्य ठाकरेंचा विरोध

मुंबई - वानखेडे किंवा ब्रेबॉर्न या मुंबईतील क्रिकेट स्टेडियमवर ‘कोविड’ सेंटर उभारण्याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेली मागणी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी फेटाळून लावली. पावसाळ्यात मैदानांवर चिखल साचण्याची शक्यता असल्याचे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.“कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी मुंबईत सर्व संसाधनांचा वापर करायला हवा. क्वारंटाईन सुविधा देण्यासाठी वानखेडे स्टेडियम ताब्यात घेण्याचा निर्णय चांगला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती आहे, वानखेडेसह ब्रेबॉर्न स्टेडियमही का ताब्यात घेत नाही?” असा सवाल संजय राऊत यांनी ट्विटरवरुन केला होता.
“संजयजी, आपण स्टेडियम किंवा क्रीडांगणांची मैदाने घेऊ शकत नाही, कारण तिथे चिखल होण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात ती वापरण्यास योग्य होणार नाहीत. भरीव/काँक्रीट बेससह मोकळी जागा वापरण्यायोग्य आहे आणि तिथे आधीच (क्वारंटाईन सुविधा) केली जात आहे.” असे उत्तर आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरुन दिले.
महापौर किशोरी पेडणेकर आणि महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनीही पावसाळ्यात चिखल होण्याच्या शक्यतेने स्टेडियम ‘कोविड’ सेंटर म्हणून वापरण्यास योग्य नसल्याचे सांगितले होते. वानखेडे स्टेडियमबाबत केवळ चाचपणी करण्यात आली, ते ताब्यात घेणे हा अंतिम पर्याय असल्याचे चहल यांनी स्पष्ट केले होते.
दरम्यान,मरीन ड्राईव्ह सिटीझन असोसिएशननेही वानखेडेवर क्वारंटाईन सेंटर उभारण्यास विरोध केला होता. पावसाळ्यात या मैदानावर चिखल होऊन रोगराई पसरु शकते, अशी भीती असोसिएशनने व्यक्त केली होती. केंद्राच्या गाईडलाईननुसार रहिवासी विभागात क्वारंटाइन सेंटर उभारण्यास मनाई असल्याच्या मुद्द्याकडेही त्यांनी लक्ष वेधले होते.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget