पाकिस्तानात विमान अपघात ; निवासी भागात विमान कोसळल्याने मोठी हानी

इस्लामाबाद - पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या एक प्रवासी विमानाला शुक्रवारी जिन्ना आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ अपघात झाला. हे विमान लाहोरहून कराची येथे जात होते.  विमान अपघातात अंदाजे १०९ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. लँडिंग होण्यापूर्वीच विमानाला कराची विमानतळाजवळ अपघात झाला. विमान मॉडेल टाऊन या निवासी भागात कोसळल्याने  निवासी भागातील अनेक घरांना आग लागली. या दुर्घटनेत ७ घरे आणि कित्येक गाड्या जळून खाक झाली असल्याची प्राथमिक माहिती आहेत. पाकिस्तानी सैन्याकडून मदत व बचावकार्य सुरु करण्यात आले.विमानात १०९ प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे. विमान अपघातानंतर चारही बाजूंनी दूरपर्यंत धूराचे लोळ पसरले होते. या अपघातामुळे जिवित आणि वित्त हानीदेखील मोठ्या प्रमाणात झाली असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. घरांमधून अनेक रहिवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरु होते. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कराची येथील रुग्णालयात आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. 


Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget