केंद्राकडून महाराष्ट्राला हक्काचे पैसे मिळाले नाहीत ; महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत खुलासा

मुंबई - महाविकास आघाडीची बैठक संपल्या नांतर पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीचा खुलासा यावेळी करण्यात आला. केंद्र सरकारने भरघोस मदत देऊन महाराष्ट्र सरकार अपयशी ठरतेय असा आभास फडणवीसांनी निर्माण केल्याचे अनिल परब यावेळी म्हणाले. फडणवीस यांनी मांडलेल्या प्रत्येक मुद्द्याचा यावेळी खुलासा करण्यात आला. महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आभासी पत्रकार परिषद घेतली. याला आम्ही प्रत्यक्षात उत्तर देत आहोत असे ते म्हणाले. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील तर शिवसेनेकडून परिवहन मंत्री अनिल परब उपस्थित होते.
देशात दोन महिन्यांपासून कोरोनाचे संकंट आलं आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण अधिवेश लवकर स्थगित करत कोरोनाविरोधाच्या लढ्याला सुरुवात केली. त्यानंतर केंद्र सरकारचा लॉकडाऊन सुरु झाला. त्याला आता दोन महिने होऊन गेले आहेत. या दोन महिन्याच्या काळात जनजीवन विस्कळीत झाले असून,उद्योग बंद पडले आहेत. लोकांना घरातच थांबावे लागत आहे. या सर्व परिस्थितीत महाविकास आघाडी सरकार समर्थपणे काम करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व एकत्र काम करत आहोत. आमच्या सरकारने प्रत्येक क्षेत्रात जास्तीत जास्त चांगले काम करण्याचा प्रयत्न केला आहे.
स्थलांतरित मजूर दोन महिने घरात राहिल्यामुळे त्यांची मानसिक अवस्था बिकट झाली. ते रस्त्यावर आले. ट्रेन सुरु झाल्यावर प्रथम खर्च पक्ष कार्यकर्ते, पदाधिकारींनी उचलला. अनेक सामाजक संस्थांनी मदत केली. त्यानंतर तोच निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला. स्थलांतरित मजुरांसाठी 100 कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यातील बरेच पैसे आतापर्यंत वापरण्यात आले आहेत. मजुरांच्या ट्रेनच्या तिकिटा, जेवणाची व्यवस्था महाराष्ट्र सरकार करत आहे. याशिवाय जे लोक पायी निघाले होते त्यांचीदेखील व्यवस्था केली. वेळोवेळी त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था केली. त्यानंतर बसेसची व्यवस्था केली.कुणाची गैरसोय होऊ नये याची पूर्ण काळजी घेत आहे. या परिस्थितीत विरोधीपक्ष म्हणून सहकार्यची अपेक्षा केली आहे. मात्र, त्यांनी वेगळी मोहिम सुरु केली.या मोहिमेतून सरकारला कसे बदनाम करता येईल आणि अस्थिरता कशी निर्माण करात येईल? असा त्यांचा प्रयत्न दिसत आहे. परंतु आम्ही आमची मानसिकता ढळू देणार नाही. कोरोनाच्या संकंटातून महाराष्ट्राला मुक्त करणार हा आमचा विश्वास आहे.

महत्वाचे मुद्दे 

- पंतप्रधान गरिब कल्याण योजनेच्या अंतर्गत गहू, तांदूळ, डाळ अशी केंद्राने मोठी निर्णय केली असे फडणवीसांनी सांगितले. पण १७५० कोटींचे गहू दिल्याचे त्यांनी सांगितले पण इतका गहू मिळाला नाही. 
- १२२ कोटी स्थलांतरित मजुरांसाठी दिल्याचे ते म्हणाले, पण अजून धान्य निघाले नाही आणि मजूर गावाला पोहोचले देखील आहेत.
- प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत ६००० देत होते. हे आधीच दिले होते.
- विधवा, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक यांना ११६ कोटी केंद्राने दिल्याचे ते म्हणाले. पण १२१० कोटी राज्य सरकार देत हे त्यांनी सांगितले नाही.
- ६०० श्रमिक ट्रेन सुटल्या. या सर्व ट्रेनचे पैसे ६८ कोटी रुपये राज्य सरकारने दिले. कुठल्याही श्रमिकाकडून पैसे घेतले नाहीत.
- ८० ट्रेन दिवसाला मागितल्या आणि ३०-३५ ट्रेन दिल्याचे आम्ही म्हटले होते. याचा त्यांना राग आला. आम्ही ४८ ट्रेनची मागणी केली पण त्यांनी एका दिवसात ४३ ट्रेन पाठवल्या. लोकं जाऊच नयेत आणि सरकार बदनाम व्हावे हा केंद्राचा डाव आहे. 
- आम्ही ट्रेन पाठवतो पण महाराष्ट्र सरकार मजुरांना जाऊ देत नाही असा खोटा आरोप केंद्राने केला. ट्रेनच्या वेळा उलटसुलट केल्या.आणि १ तास आधी कळवले. गुजरातला १५०० ट्रेन दिल्या पण मोठे राज्य असलेल्या महाराष्ट्राला ७०० ट्रेन दिल्या. Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget