लॉकडाऊनचा फज्जा उडाल्याने मुंबईत सर्व सवलती मागे

मुंबई - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह देशातही लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा तिसरा टप्पा ४ मे पासून सुरु झाला आहे. या टप्प्यात दारु विक्री करणारी दुकाने सुरु करण्यापासून इतरही दुकानांवरील काही निर्बंध उठवून नियम शिथिल करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला होता. पण, नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा फज्जा उडवल्यामुळे आता शिथिल करण्यात आलेले लॉकडाऊन आणखी कठोर होऊ शकते. पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी यासंदर्भातील माहिती देत मुंबईत अत्यावश्यक सेवांची दुकाने वगळता इतर सर्व सवलती पुरवणारी दुकाने बंद राहणार असल्याची माहिती दिली. नियम शिथिलीकरणाला अपेक्षित शिस्तबद्ध पद्धतीने पाठिंबा मिळत नसल्यामुंळे हा निर्णय घेण्यात आला आहे. पालिका आयुक्तांना दिलेल्या विशेषाधिकाराचा वापर करुन हा निर्णय घेतला गेला. परिणामी, आजपासून पुन्हा एकदा शहर पूर्ण लॉकडाऊन असणार आहे. 
दरम्यान,सोमवारपासून मुंबई आणि देशातील काही भागांमध्ये दारुविक्रीची परवानगी देण्यात आली. अनेक राज्यांमध्ये एका दिवसात दारु विक्रीने कोट्यवधींची कमाईही झाली. पण, यामध्ये अनेक ठिकाणी लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले .त्यातच मुंबईत सातत्याने नियमांचे होणारे उल्लंघन पाहता अखेर सर्व सवलती मागे घेत लॉकडाऊनचे काटोकेरपणे पालन करावे असे आवाहन करण्यात आले. 
सोमवार आणि मंगळवार या दोन दिवशी मुंबई शहरात मद्यप्रेमींकडून रांगेत सोशल डिस्टन्सिंगच्या कोणत्याही नियमांचे पालन केले जात नव्हते. दारू खरेदीसाठी लोक अक्षरशः एकमेकांवर अनेक ठिकाणी तुटून पडले होते. दारूची दुकाने सुरू करताना दुकानासमोर एकावेळी पाचच ग्राहक उभे राहतील अशी अट घालण्यात असतानाही त्याचं पालन केले गेलेच नाही. नियमांची होणारी ही पायमल्ली आणि त्यातून कोरोनाचा फैलाव होण्याची भीती पाहता मुंबई महापालिकेने लॉकडाऊनची शिथिलता रद्द करत शहरात दारुची दुकानंही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget